ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर, ‘उबाठा’ गटातील हे दोन नेते ठाकरेंवर नाराज?
ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असून 'उबाठा' गटातील दोन नेते ठाकरेंवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांचा आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार तर मंत्रीपद, गटनेते पदासाठी माझा हक्क असतानाही पदरात काहीच पडले नाही, भास्कर जाधवांची नाराजी...
मुंबई, १० मार्च २०२४ : ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असून ‘उबाठा’ गटातील दोन नेते ठाकरेंवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांचा आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज रात्री रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तर रवींद्र वायकर यांचा आज रात्री आठ वाजेनंतर वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून भास्कर जाधव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, मंत्रीपद, गटनेते पदासाठी माझा हक्क असतानाही माझ्या पदरात काहीच पडले नाही. पक्षासाठी आपण सर्व काही केले, पण पक्षाने पदे देताना आपला विचार केला नाही. मी लढतो, ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी. परंतु मला मंत्रीपद मिळाले नाही. गटनेतेपद मिळाले नाही. यापुढेही मिळणार नाही, हे माहीत आहे.