ठाकरे गटाचा पॉडकास्ट, नितीन देखमुख यांनी काय केले खळबळजनक गौप्यस्फोट?
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांना सरकार पाडायचं माहितीये, ठाकरे गटाच्या पॉडकास्टमधून जोरदार टीकास्त्र
मुंबई : अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत. बंडाच्या दिवशीच्या सुटकेचा थरार कैलास पाटील यांनी सांगितला. कैलास पाटील हा घटनाक्रम सांगताना म्हणाले, त्या दिवशी विधानसभेची मतमोजणी होती. कामासाठी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर गेलो. तिथं त्यांनी सांगितलं की आपल्याला पुढे एका ठिकाणी जायचं आहे तुम्ही पुढे चला. मग मी ठाण्याला महापौर बंगल्यावर गेलो. कारण तिथं अनेक बैठका व्हायच्या. पण त्यावेळी तिथं चार-पाच आमदार होते. तिथं पहिल्यांदा मनात शंकेची पाल चुकचुकली. वाटलं काहीतरी वेगळं घडतंय. ठाण्याच्या महापौर बंगल्यावरून उद्धवसाहेबांना लोकेशन पाठवलं. त्यांना फोन करून सांगितलं की इथं आमदार जमले आहेत. मला काहीतरी वेगळं वाटतंय.मग एकनाथ शिंदे यांच्या माणसाने आम्हाला गाडीत बसवून बाहेर नेलं. मग हळूहळू कळू लागलं की आपण शहराच्या बाहेर पडतोय. पण मी उद्धवसाहेबांच्या संपर्कात होतो. त्यात माझ्या फोनची बॅटरी संपत आली होती. मी संधी सोधत होतो की आपली गाडी थांबेल आणि पळ काढता येईल. पण… पुढे नेमकं काय झालं बघा व्हिडीओ