वारंवार दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांच्या हिरवळीवर त्यांना बसावे लागते, राऊतांनी डागलं टीकास्त्र

वारंवार दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांच्या हिरवळीवर त्यांना बसावे लागते, राऊतांनी डागलं टीकास्त्र

| Updated on: Mar 26, 2024 | 2:35 PM

लोकसभेच्या जागावाटपाबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीही नाही, त्यांचे दिल्लीतील नेते जे सांगतील, ज्या जागा देतील, त्याच त्यांना मिळतील. पूर्वी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत मातोश्रीवर चर्चा व्हायची आणि मातोश्रीतूनच निर्णय घेतले जायचे. आता...

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीच प्रतिष्ठा नाही. ब्रिटीश आणि मोगल काळात मांडलिक, संस्थानिक यांना जे स्थान होते, तेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात आहे. स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत आणि हिंमत, अधिकार यादोन्ही नेत्यांना नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. ते पुढे असेही म्हणाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघे नेते मांडलिक आहेत. त्यांना वारंवार दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांच्या हिरवळीवर बसावे लागते. इकडे येताना त्यांच्या कपड्यांवर तेथील गवत दिसते, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ते असेही बोलले की, लोकसभेच्या जागावाटपाबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीही नाही, त्यांचे दिल्लीतील नेते जे सांगतील, ज्या जागा देतील, त्याच त्यांना मिळतील. पूर्वी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत मातोश्रीवर चर्चा व्हायची आणि मातोश्रीतूनच निर्णय घेतले जायचे. आता शिंदे, पवार यांना दिल्लीत जावे लागते. उदयनराजे यांनीही दिल्लीत जावे लागते, आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रातच घेतो. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही, असेही राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे.

Published on: Mar 26, 2024 02:35 PM