'मृत्यू अटळ...', राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द मात्र सामनातून सडकून टीकास्त्र

‘मृत्यू अटळ…’, राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द मात्र सामनातून सडकून टीकास्त्र

| Updated on: Sep 30, 2023 | 12:54 PM

VIDEO | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द अन् सामनातून जोरदार हल्लाबोल, 'जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी राहुल नार्वेकर घानाच्या देशात निघाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांचे स्वागत घानात होणार आहे काय?' असे म्हणत सामनातून त्यांना सवाल करण्यात आलाय.

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घाणा देशाच्या दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाणा देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्याचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आजच्या सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. लोकशाहीचा मुडदा पाडून ते निघाले ‘घाना’ देशी! या शीर्षका खाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला असून यामाध्यमातून राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी राहुल नार्वेकर घानाच्या देशात निघाले आहेत. त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांचे स्वागत घानात होणार आहे काय? असा सवालही उपस्थित केला आहे.

Published on: Sep 30, 2023 12:46 PM