संजय शिरसाट यांना सत्तेची मस्ती, ठाकरे गटातील नेत्याची सडकून टीका
VIDEO | संजय शिरसाट यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नसल्याचा ठाकरे गटातील नेत्याचा गंभीप आरोप
पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. अशातच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद कोळी यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट याना सत्तेची आणि आमदारकीची मस्ती चढली आहे, त्यामुळे ते महिलांना वाईट नजरेने बघत आहे. सुषमा अंधारे हे प्रत्येक भाषणादरम्यान प्रत्येक कार्यक्रमादरम्यान सगळ्यांना आदराने संबोधित करताना दादा, भाऊ आणि ताई असा उल्लेख करतात. परंतू, गद्दार आणि नीच प्रवृत्तीच्या संजय शिरसाट यांना सत्तेची मस्ती आली आहे, असे म्हणत शरद कोळी जोरदार संजय शिरसाट यांच्यावर घणाघात केला आहे. तर संजय शिरसाट यांना ज्या मतदारांनी निवडून दिले आहे ते लोक सुद्धा त्यांना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी भीत आहेत कारण संजय शिरसाट यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही, असे म्हणत शरद कोळी यांनी गंभीर आरोप केला आहे.