सुषमा अंधारे यांची रवी राणा यांच्या मतदारसंघात जाहीर सभा, शिवगर्जना अभियान मेळाव्यात काय संवाद साधणार?
VIDEO | ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर, शिवगर्जना अभियान मेळाव्यात काय बोलणार?
अमरावती : राज्यभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा शिवगर्जना अभियान मेळावा सुरू आहे. शिवसेनेचा शिवगर्जना अभियान मेळाव्याअंतर्गत अमरावतीच्या अचलपूर आणि बडनेरा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मार्गदर्शन करणार आहे. सुषमा अंधारे या सध्या पश्चिम विदर्भातील दोऱ्यावर असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी बुलढाणा, अकोला जिल्ह्याला भेट दिली तर आज सुषमा अंधारे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या मतदार संघात संध्याकाळी ७ वाजता सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. दरम्यान, आमदार रवी राणा हे सातत्याने ठाकरे गटावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका करत असतात, त्यामुळे रवी राणांच्या मतदार संघात येऊन सुषमा अंधारे काय बोलणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.