उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हुतात्म्यांना वंदन
106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्यांचे स्मरण करण्यासाठी आणि त्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मध्यरात्री हुतात्मा स्मारकावर हजेरी लावली.
मुंबई : महाराष्ट्र दिन सर्वत्र जोरात साजरा केला जात आहे. तर महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यात त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यात आला. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्यांचे स्मरण करण्यासाठी आणि त्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मध्यरात्री हुतात्मा स्मारकावर हजेरी लावली. तसेच हुतात्म्यांना वंदन केलं. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या 106 हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना मध्यरात्री ठाकरे पितापुत्रांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासह ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित होते.
Published on: May 01, 2023 08:44 AM