तुमचेही पाय चिखलाचेच; 'सामना'तून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर निशाणा

तुमचेही पाय चिखलाचेच; ‘सामना’तून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर निशाणा

| Updated on: Feb 11, 2023 | 8:08 AM

...मग ८ वर्षात तुम्ही कोणता गुलाल उधळला? भाजपच्या गुलाल आणि चिखलाच्या टीकेला सामनातून प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत गुलाल, चिखल आणि कमळाचा उल्लेख करत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणावर ‘सामना’तून आज टीका करण्यात आली आहे. तुमचेही पाय चिखलाचेच आहेत हे विसरू नका, असा सूचक इशाराच ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे. तुमचेही पाय चिखलाचेच आहेत. हे विसरू नका. तुम्ही विसरलात तरी जनता त्याची आठवण योग्यवेळी तुम्हाला करून देईलच, असे ‘सामना’तून म्हटले आहे. चिखल, कमळ, गुलाल हे यमक जुळवायला, बोलायला आणि टाळ्या वाजवायला ठीक आहे. पण तुम्ही काँग्रेस आणि गांधी-नेहरू घराण्याविषयी बोलला ते काय होते? तुमच्याजवळही चिखल होता आणि तोच तुम्ही फेकला, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Published on: Feb 11, 2023 08:08 AM