‘मविआ’चं जागावाटप जाहीर, ठाकरे गट-शरद पवार गटाला किती जागा? कोणते उमेदवार फिक्स?
महाविकास आघाडीची शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप रखडलं होतं. अखेर आज ‘मविआ’चं जागावाटप जाहीर करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लोकसभा लढणार आहे. महाविकास आघाडीची आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे जागा वाटप जाहीर करण्यात आलं. महाविकास आघाडीची शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 17, राष्ट्रवादी शरद पवार 10 जागा लढवणार तर उद्धव ठाकरे गट 21 जागेवर निवडणूक लढवणार आहे. मविआत कोणात्या जागेवर कोणते उमेदवार लढणार लोकसभा?