Special Report | खारघर दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा नवा आरोप; म्हणताय, ‘…म्हणून शेड टाकलं नाही’
VIDEO | खारघर प्रकरणावरून वाद कायम, ठाकरे गट Vs शिवसेना आमने-सामने, काय केला संजय राऊत यांना नवा गंभीर आरोप?
मुंबई : महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्यातील झालेल्या दुर्घटनेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा आरोप केला आहे. ड्रोनद्वारे दृश्य घेण्यासाठी श्रीसेवकांवर कोणतंही शेड किंवा मंडप टाकण्यात आले नव्हते असे संजय राऊत म्हणाले. तर या दुर्घटनेची चौकशी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या नेतृत्वात होणार आहे. यावरून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत चांगलाच हल्लाबोल केला तर सामनातून देखील त्यांनी या प्रकरणावर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही तर संजय राऊत यांनी आपला मोर्चा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वळवला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन सांस्कृतिक विभागाने केलं होतं. पण सांस्कृतिक मंत्री कुठं आहेत महाराष्ट्रात आहे का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला. दरम्यान, या कार्यक्रमाचं कंत्राट ज्या कंपनीला दिलं होतं त्यावरूनही ठाकरे गट आणि शिंदे यांची शिवसेना आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. १४ कोटींच्या कंत्राटावरून संजय राऊत यांनी काय केला आरोप बघा स्पेशल रिपोर्ट