अमित शाह नेमकं मुंबई दौऱ्यावर का येतायत? संजय राऊत यांनी थेट कारणच सांगितलं
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टीका, म्हणाले...
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील मुंबई दौऱ्यावर येत असल्याने त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. अमित शाह हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पाहण्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे त्यांनी ही सभा पाहिलीच पाहिजे असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे. अमित शाह शनिवारी सायंकाळी मुंबईत येत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांच्या स्वतंत्र बैठकीला हजर राहणार आहेत. त्याच बरोबर ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याने या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.