‘तुम्ही वैज्ञानिकांना विसरता आणि प्रत्येक ठिकाणी’; चंद्रयान-3 वरून राऊत यांचा मोदी यांना टोला
जगाच्या पाठीवर इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी मैलाचा टप्पा गाठत इतिहासात देशाचे नाव कोरले. 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 यशस्वी उतरले.
मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | 23 ऑगस्ट या दिवशी भारताचे जगात मोठे नाव झाले. याच दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 यशस्वी उतरले आणि जगात भारताचा बोलबाला झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये जाऊन वैज्ञानिकांची भेट घेतली. त्यांचे कौतूक केलं. तर लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्याला शिवशक्ती असे नाव दिले. त्यावरून आता राजकारण तापत आहे. यावरून काँग्रेसकडून आधीच टीका करण्यात आली होती. त्यानंतर ता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे.
त्यांनी, भाजपला या व्यतिरिक्त काहीच जमत नाही. ज्या ठिकाणी चद्रयांनने तिरंगा फडकवला आहे. त्या जागेला वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं नाव दिलं पाहिजे होतं. हे सर्व पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी जे काम केलं आहे त्यामुळे घडलं आहे. तर तुम्ही वैज्ञानिकांना विसरता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता. परंतु काही गोष्टी असतात त्या विज्ञानाशी जोडलेल्या असतात हे वीर सावरकरांचे म्हणणे देखील आहे असे राऊत यांनी म्हटलं आहे.