‘त्या’ क्लिपवरून खंडाजंगी, खैरेंनी मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार
चंद्रकांत खैरे हे मुस्लिमांना ५ वेळा नमाज पठण करण्यास सांगतात, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर हा माणूस वेडा तर नाही झाला ना… असं म्हणत संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर खोचक टीकाही केली होती. संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे हे मुस्लिमांना ५ वेळा नमाज पठण करण्यास सांगतात, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर हा माणूस वेडा तर नाही झाला ना… असं म्हणत संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर खोचक टीकाही केली आहे. संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय शिरसाट यांनी दाखवलेला व्हिडीओ मी पाहिला नाही. पण शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयी कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. जर कुणी एखाद्या धर्माचा कुणी आदर केला तर आपल्या धर्माचा अनादर होतो, अशी संकुचित विचारसरणी हिंदुत्वाची नाही. त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका व्यापक आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही हिंदू धर्माची प्रतारणा करणारी असू शकत नाही.’, असे अंबादास दानवे म्हणाले.