तेव्हा आम्ही देखील तुमच्यासोबत होतो विसरू नका, अरविंद सावंत यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दैऱ्यावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. अशातच आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दैऱ्यावर टीका केली आहे.
विकासकामं करताना आम्ही देखील तुमच्यासोबत होतो, हे विसरू नका असे म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सरकारने कर्जाच्या वाटपाचा बाजाप मांडला आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 2014 साली ही विकास कामं सुरू केली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पण 2014 ते 2019 या साली आम्ही देखील तुमच्यासोबत होतो. हे तुम्ही कसं विसरता. त्यामुळे त्या विकासकामात फक्त तुमचा हक्क…असे म्हणत अरविंद सावंत यांनी सवाल उपस्थित केला आहे.
Published on: Jan 20, 2023 02:48 PM
Latest Videos