बाळासाहेब थोरात यांनी बंडाची का घेतली भूमिका? संजय राऊत यांनी सांगितले कारण

बाळासाहेब थोरात यांनी बंडाची का घेतली भूमिका? संजय राऊत यांनी सांगितले कारण

| Updated on: Feb 08, 2023 | 11:38 AM

काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला पण कारण सांगितले कारण?

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील फूट समोर आली आहे. थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. असे असले तरी त्यांनी कारण सांगितले आहे. बाळासाहेब थोरात शांत आणि संयमी आहेत. चारित्र्य संपन्न नेते आहेत. त्यांनी बंडाची भूमिका घेतली म्हणजे नक्कीच ते मनातून दुखावले असणार असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबांना मी ओळखतो. त्यांच्या नसानसात काँग्रेस आहे. त्यांनी राजीनामा देणं हा त्यांच्या पक्षांतर्गत वाद आहे. या वादावर आम्ही बोलणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Feb 08, 2023 11:38 AM