सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत दिलं थेट आव्हान, काय म्हणाले बघा
VIDEO | सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यापासून किरीट सोमय्या यांच्यापर्यंत सर्वांचाच घेतला खरपूस समाचार, बघा नेमकं काय म्हणाल्या...
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खेडमधील आजच्या सभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीक केली. इतकेच नाही तर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत थेट आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुणे पोटनिवडणुकीच्या ऑनलाईन प्रचारावरुन टीका केली होती. सत्ता गेल्यानंतर वाटलं होतं की लाईनीवर येतील, पण हे अजूनही ऑनलाईनच आहेत, असं शिंदे म्हणाले होते. शिंदेंच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी तसंच प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या 40 आमदारांचं डिपॉझिट वाचवायची तयारी ठेवा, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमकं काय आव्हान दिलं बघा…
Latest Videos