खोक्यांचे राजकारण करणं सोप्पं, संजय राऊत यांचा शिंदे गटाला टोला
'... म्हणून राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात यात्रा सुरू केली असली तरी मी या यात्रेत सहभागी होण्यासाठी काश्मीरची भूमी निवडली'
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सध्या जम्मूला आहेत. यावरून शिंदे गटातील एका नेत्याने संजय राऊतांवर निशाणा साधला होता. यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्याच्या समाचार घेत पाकिस्तानात जा म्हणाणाऱ्यांनी आधी काश्मिरी पंडितांचे दुःख ऐकावं, जे आम्ही सातत्याने ऐकत आहोत. तिथे बसून खोक्यांचे राजकारण करणं सोप्पं आहे, असे म्हणत राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही नरेंद्र मोदी यांची माणसं आहोत असं सांगणे ही मर्दुमकी नाही. तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी जी काश्मीरबाबत आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण झालेली नाहीत. म्हणून राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात यात्रा सुरू केली असली तरी मी या यात्रेत सहभागी होण्यासाठी काश्मीरची भूमी निवडली, असेही राऊत म्हणाले. तर राऊतांनी जम्मूमध्ये शिवसेना विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.