ठाण्यात रिक्षाचालकांची स्वयंघोषित दरवाढ, प्रवाशांमध्ये संताप

ठाण्यात रिक्षाचालकांची स्वयंघोषित दरवाढ, प्रवाशांमध्ये संताप

| Updated on: Dec 02, 2021 | 12:00 PM

ठाण्यातील रिक्षाचालकांनी स्वंयघोषित दरवाढ केल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील रिक्षाचालकांनी सावरकरनगर येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दरवाढ केल्याचं समोर आलं आहे.

ठाण्यातील रिक्षाचालकांनी स्वंयघोषित दरवाढ केल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील रिक्षाचालकांनी सावरकरनगर येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दरवाढ केल्याचं समोर आलं आहे. कोरोना काळात ठाण्यातील रिक्षा चालकांनी शेअर रिक्षा भाड्यामध्ये दरवाढ केली आहे. आरटीओंच्या आदेशाला काही रिक्षाचालक जुमानत नसल्याचं यानिमित्तानं दिसून आलं आहे. रिक्षाच्या दरवाढीमुळं प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. रिक्षाचालकांच्या कृतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.