दि सिनेवंडर मॉल आणि बिझनेस पार्कजवळ भीषण आग; कारवाईचे संकेत

| Updated on: Apr 19, 2023 | 10:01 AM

आमदार निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी जात मदत कार्याची माहिती घेतली. त्याचवेळी त्यांनी, फायर ब्रिगेडच्या 5 बंबांच्या मदतीने आगिवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे

ठाणे : ठाण्यात सिनेवंडर मॉलजवळ असलेल्या इमारतीला भीषण आग लागली आहे. आग लागल्याने संबंधित परिसरात काही नागरिक आडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आग्निशामक दलाच्या गाड्या आणि निरंजन डावखरे दाखल झाले आहे. आगीवर पाच बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. ही आग 8.20 मिनिटांनी लागली, तिसऱ्या माळ्यावरती पहिल्यांदा आग लागल्याचे कळत आहे. तर आत जवळजवळ 100 लोक होती असेही म्हटलं जातयं. तर आमदार निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी जात मदत कार्याची माहिती घेतली. त्याचवेळी त्यांनी, फायर ब्रिगेडच्या 5 बंबांच्या मदतीने आगिवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. यानंतर आगीचं नेमकं कारण काय हे तपासून यात दोषी आढळल्यास कारवाई करू असे संकेत दिले आहेत.

Published on: Apr 19, 2023 09:08 AM
सरकार कोसळणार? अजित पवार यांच्या चर्चांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ ट्विटनं खळबळ, नेमका अर्थ काय?
मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करा; ‘या’ संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र