मेरे पास बाळासाहेब... 'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत प्रियंका चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल

मेरे पास बाळासाहेब… ‘दिवार’मधील ‘तो’ डायलॉग म्हणत प्रियंका चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल

| Updated on: May 14, 2024 | 1:11 PM

एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दार म्हण श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’, असं म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी शिंदेंवर हल्लाबोल केला होता. यानंतर पुन्हा प्रियंका चतुर्वेदींनी ऐकवला दिवार मधला आणखी एक डायलॉग

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे, अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली होती. एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दार म्हण श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’, असं म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी शिंदेंवर हल्लाबोल केला होता. यानंतर पुन्हा प्रियंका चतुर्वेदींनी दिवार मधला आणखी एक डायलॉग म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. चतुर्वेदी म्हणाल्या, मी आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या भागात आहे. दिवारमध्ये आणखी एक डायलोक आहे, तो पुन्हा मी येथे म्हणणार आहे. तुम्हारे पास गाडी और बंगला है… मेरे पास बाळासाहेब ठाकरे के विचार है राजन विचारे के पास ठाकरे के विचार है…असे म्हणत पुन्हा एकदा प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावत चॅलेंज दिले आहे.

Published on: May 14, 2024 01:11 PM