12 तारखेला आम्ही तुमचे 12 वाजवणार, तयार राहा; जितेंद्र आव्हाडांना कुणी दिलं आव्हान?
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांना अवॉईड करून ठाण्यातील बरेच नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सर्व कंपूला कंटाळून ही सर्व मंडळी आमच्यासोबत येत आहे. 12 तारखेला आम्ही त्यांचे बारा वाजवणार आहोत, असं नरेश म्हस्के म्हणालेत. जितेंद्र आव्हाड आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या सरकारबद्दल जी वक्तव्य करत आहात, जी टीका करत आहात, त्याचं उत्तर आम्ही बारा तारखेला देणार आहोत. त्यामुळे तयार राहा, असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
Published on: Feb 11, 2023 07:20 AM
Latest Videos