“रोशनी शिंदे यांच्या जीवाला ठाकरे गटाकडूनच धोका, त्यांना संरक्षण द्या”
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. रोशनी शिंदे यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पाहा व्हीडिओ...
ठाणे : माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. “ज्यावेळी आनंद दिघेसाहेब अॅडमिट होते. तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी येऊन गेले. भेटून बाहेर आले त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याबाबत ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याचा खुलासा व्हायला पाहिजे. त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्यांच्याबरोबर काय झाला नक्की कोणाला माहित नाही. ठाणेकरांच्या मनामध्ये संशय आहे”, असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे. रोशनी शिंदे यांच्या जीवाला ठाकरेगटाकडून धोका आहे. रोशनी शिंदेला संरक्षण मिळावं, अशी मागणीही माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्राद्वारे केलेली आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे.