Thane Weather | ठाणे शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळणार? हवामान खात्यानं कोणता दिला अलर्ट?
VIDEO | गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना राज्यात पुन्हा पावसाचा कमबँक, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट, तर मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली.
ठाणे, १७ सप्टेंबर २०२३ | ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच ठाणे शहरासह उपनगरात देखील मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर कालपासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पहाटेपासूनच पालघर जिल्ह्याच्या काही भागात संततधार पडणाऱ्या पावसाने दुपारच्या सुमारास मुसळधार अशी सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. पालघरच्या बोईसर, डहाणू, कासा, तलासरी, विक्रमगड या परिसरात दमदार पाऊस सुरू झाला असून मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय. पावसाअभावी संकटात सापडलेले भात पीक सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा बहरला असून या पावसामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येतोय. पुढील तीन दिवस जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.