ठाणेकरांनी शहरात पडलेली झाडे दोरीने बांधली, वृक्ष प्राधिकरणाच्या कामावर नागरिकांचा आक्षेप

ठाणेकरांनी शहरात पडलेली झाडे दोरीने बांधली, वृक्ष प्राधिकरणाच्या कामावर नागरिकांचा आक्षेप

| Updated on: Aug 09, 2023 | 8:54 AM

VIDEO | वृक्ष प्राधिकरणाच्या झाडे छाटणीच्या कामावर संशय, पडलेली झाडे दोरीने बांधून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार! अनेक वेळा तक्रार करून देखील वृक्षप्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तीन हात नाका परिसरातील नागरिकांचा आरोप

ठाणे, ९ ऑगस्ट २०२३ | पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे शहरात झाडे पडण्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. ठाणे शहरातील झाडे पडण्याचे संकट अजूनही कायमच असून ठाण्यातील वृक्षप्राधिकरणाच्या कामावर तीन हात नाका परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. झाडे छाटणीच्या कामावर संशय व्यक्त करत पडलेली झाडे दोरीने बांधून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे शहरातील पडलेली झाले चक्क दोरीने बांधून ठेवण्यात आली आहे. अनेक वेळा तक्रार करून देखील वृक्षप्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तीन हात नाका परिसरातील नागरिकांनी केला आहे. तर स्थानिकांकडून झाडे कापण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली अन्यथा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Published on: Aug 09, 2023 08:52 AM