Dhananjay Munde : ‘पंकजा ताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज…’, भर सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. तूतारीकडून निष्ठावंतांना उमेदवारी नाही परळी मतदारसंघात जातीपाती धर्माचे राजकारण अशाच पद्धतीने तेवत ठेवायचे? असं म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवारांना लक्ष्य केलंय.
विधानसभेत पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. महायुती म्हणून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी माध्यमातून निवडणूक लढण्याच ठरलं. त्यावेळी मी विद्यमान आमदार असताना पंकजाताईंनी मोठं मन केलं. त्यामुळे मी आज इथे असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. परळी विधानसभा मतदारसंघात बरदापुर गावात आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते. परळीत तुतारी कडून अकरा लोकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र मिळणार होती एकालाच, मीच त्यांच्या नेत्याला म्हणालो की लवकर तिकीट फायनल करा नाहीतर दोघा तिघांना कागद वेचण्याची वेळ येईल. जे निष्ठावंत होते त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र जे बाहेरून आले त्यांना उमेदवारी देण्यात आली. ती उमेदवारी कशासाठी दिली असेल तुतारीला जिंकण्यासाठी की परळी मतदारसंघात जातीपाती धर्माचे राजकारण अशाच पद्धतीने तेवत ठेवायचे यासाठी? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षरीत्या शरद पवारांना लक्ष्य केले. मी जर चुकलो असेल तर मला बदनाम करा, मात्र प्रभुवैदनाथाच्या मातीला बदनाम करू नका असं आवाहन धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केलंय.