भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज ठाकरे दिल्लीला, महायुतीत येणार?
महायुतीत भाजपला सोबत घेण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून दिल्लीत राज ठाकरे दाखल झाले होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसही त्याच दिवशी दिल्लीला होते. त्यामुळे भाजप मनसे युतीसह मनसेला महायुतीत मनसे घेण्यासंदर्भात शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह
मुंबई, १९ मार्च २०२४ : भाजप आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्बत होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः दिल्लीला रवाना झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा अन् महापालिका निवडणुकांवरही निर्णय होणार असल्याचे म्हटले जात आहे. महायुतीत भाजपला सोबत घेण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून दिल्लीत राज ठाकरे दाखल झाले होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसही त्याच दिवशी दिल्लीला होते. त्यामुळे भाजप मनसे युतीसह मनसेला महायुतीत मनसे घेण्यासंदर्भात शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत. राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेत, राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेही सोबत होते. दरम्यान, ३ ते ४ दिवसातील राज ठाकरे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा असून ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी भेटलेत. गेल्या काही दिवसापासून मनसे या पक्षाला महायुतीमध्ये घेण्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. बघा नेमकं काय घडतंय…?