हीच आघाडी राज्यातील काँग्रेसचं नुकसान करेल, जिशान सिद्दिकी नेमकं काय म्हणाले?
सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जिशान सिद्दिकींनी सडकून टीका केली आहे. ठाकरे गट काँग्रेसला किती महत्व देतं हे यावरून दिसतंय, असंही जिशान सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. नेमकं काय केलं ट्वीट अन् कुणाला दिला इशारा?
एक दिवस ही आघाडी राज्यातील काँग्रेस पक्षाचं नुकसान करणार, अशी टीका काँग्रेस आमदार जिशान सिद्दिकींनी केली आहे. सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जिशान सिद्दिकींनी सडकून टीका केली आहे. ठाकरे गट काँग्रेसला किती महत्व देतं हे यावरून दिसतंय, असंही जिशान सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सांगली आणि मुंबई दक्षिण मध्यसाठी उमेदवार जाहीर करणे हे दर्शवते की ते त्यांचे मित्र पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला किती महत्त्व देतात आणि त्यांचा किती आदर करतात. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात बोलल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे, पण एक दिवस लोकांना कळेल की, ही आघाडी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचेच नुकसान कसे करतेय’, असं ट्वीट जिशान सिद्दिकींनी करून एकप्रकारे इशारा दिलाय.
Published on: Mar 27, 2024 04:01 PM
Latest Videos