Nagpur | मृत्यूपूर्वी आयसीयूमध्ये केलं पुस्तकाचं प्रकाशन, नागपुरातील हृदय हेलावणारा प्रसंग

| Updated on: Nov 24, 2021 | 10:07 PM

मॉम यू आर ग्रेट या पुस्तकाचं प्रकाशन लेखिकेच्या मृत्यूपूर्वी आयसीयूमध्ये करण्यात आले. सुभाषिणी कुकडे असं या 74 वर्षीय लेखिकेचे नाव आहे. नागपूरच्या डॉक्टर दंदे रुग्णालयानं हा हृदय हेलावणारा प्रसंग अनुभवला.

नागपूर : गेली काही वर्षे परिश्रम घेऊन लिहिलेले पुस्तक मरणापूर्वी प्रकाशित व्हावे, अशी शेवटची इच्छा मरणासन्न अवस्थेतील एका लेखिकेची होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पुढाकाराने आयसीयूत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. काही तासांतच लेखिकेनं जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन 19 नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजता आयुसीयूमध्येच नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं. मॉम यू आर ग्रेट या पुस्तकाचं प्रकाशन लेखिकेच्या मृत्यूपूर्वी आयसीयूमध्ये करण्यात आले. सुभाषिणी कुकडे असं या 74 वर्षीय लेखिकेचे नाव आहे. नागपूरच्या डॉक्टर दंदे रुग्णालयानं हा हृदय हेलावणारा प्रसंग अनुभवला.