AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थरकाप उडवणारी घटना; दैवबलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला; धावत्या बसचे चाक निखळले; नेमकं कुठं घटलं हे?

थरकाप उडवणारी घटना; दैवबलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला; धावत्या बसचे चाक निखळले; नेमकं कुठं घटलं हे?

| Updated on: Jun 25, 2023 | 10:52 AM

क्लचप्लेट संपली तरी गाडी पळवणे, गेअरचं दांडकं महिला कंडक्टरने दोरीनं पकडणं किंवा अॅक्सिलेटर दोरीनं ओढण्याचे प्रकार समोर आले आहेत. पण आतातर प्रवाशांच्या जीवावरच बेतणारी घटनाच आता उघडकीस आली आहे.

परभणी : एसटी महामंडळाच्या भोंगळ आणि गलथान कारभाराच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ज्यात क्लचप्लेट संपली तरी गाडी पळवणे, गेअरचं दांडकं महिला कंडक्टरने दोरीनं पकडणं किंवा अॅक्सिलेटर दोरीनं ओढण्याचे प्रकार समोर आले आहेत. पण आतातर प्रवाशांच्या जीवावरच बेतणारी घटनाच आता उघडकीस आली आहे. फक्त चालकाच्या समय सुचतकतेमुळे मोठी दुर्घटना टळलीच तर प्रवाशांचे जीवही बालंबाल बचावले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गंगाखेड येथून नांदेडकडे जाणाऱ्या धावत्या एसटीबसचे मागचे चाक निखळले. ही बस परभणी आगाराची असून तिचे चाक प्रवासादरम्यान निखळले. त्यामुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. दरम्यान, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला. तर याच्या आधी देखील 2 एक वर्षांपुर्वी परभणीत एसाच प्रकार समोर आला होता. तेव्हाही पूर्णा तालुक्यात धावत्या बसची एकामागून एक अशी दोन चाकं निखळून पडली होती. तर तेंव्हाही फक्त चालकाच्या समय सुचतकतेमुळे मोठी दुर्घटना टळली होती.

Published on: Jun 25, 2023 10:52 AM