Nagpur | 28 फेब्रवारीला नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

Nagpur | 28 फेब्रवारीला नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

| Updated on: Dec 27, 2021 | 5:53 PM

राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार आहे. तशी घोषणाच आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार आहे. तशी घोषणाच आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

आज विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशनावर चर्चा झाली. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचं आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान आज जाहीर करण्यात आलं आहे.

या आधी सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा आग्रह विरोधकांनीही धरला होता. त्यावर मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांना हवाई प्रवास सुद्धा करण्यास मनाई करण्यात आल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता. तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसेल तर पुढील अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनीही या मागणीला संमती दिली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.