Special Report | तपासणीचं सूत्रं CBI कडे; मेन लाईनचा सिग्नल तरी रेल्वे दुसऱ्या रुळावर आली कशी?
VIDEO | तपासाची सूत्र आता सीबीआयकडे, अपघातास कारण सिग्नल बिघाड ? नेमकं काय घडलं बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : ओडिशातील बालासोरमध्ये घडलेल्या रेल्वे अपघाताचं कारण आता सीबीआय तपासणार आहे. अपघात कसा झाला, अपघाताचं कारण काय हे शोधून काढण्यासाठी आता या अपघाताच्या तपासाची सूत्र सीबीआयकडे देण्यात आली आहे. अपघाताचं कारण सापडलंय मात्र अहवाल आल्यावरच त्यावर बोलणार, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय. अपघातामागे इंटरलॉकिंग सिग्नलचा बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रेल्वेकडून तसं कोणतही ठोस कारण दिलेल नसल्याचं दिसतंय. तर रल्वेमंत्री म्हणताय अपघाताचं कारण समजलंय, दोषी देखील समोर आले आहे पण चौकशी अंती सगळं समोर येईल. रेल्वेचे अधिकारी म्हणताय कारण समजलंय पण ते प्राथमिक अवस्थेत असून या अपघाताच्या कारणाचा तपास सुरूये. मात्र हा मोठा रेल्वे अपघाड रूळावरून डबे घसरून झाला की दोन रेल्वे एकमेकांना धडकून झाला. याबाबत रेल्वेकडे अद्याप कोणतीही माहिती नाहीये. बघा स्पेशल रिपोर्ट