महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारकऱ्यांपेक्षा मोठे नाही, कुणाचं वक्तव्य? वारकरी परिषदेतून सरकारकडे कोणती केली मागणी
VIDEO | पंढरपुरातील विठ्ठलाच्या शासकीय पूजेसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना वेळेची मर्यादा असली पाहिजे, राज्यस्तरीय वारकरी परिषदेतून राज्य सरकारकडे नेमकी काय केली मागणी?
बुलढाणा : गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला लाखो वारकरी येत असतात, मात्र त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही, वारकऱ्यांसह इतर भाविकांना दोन-तीन दिवस दर्शनासाठी वाट पाहावी लागते, परंतु नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांना काही वेळात दर्शन होते, हे थांबलं पाहिजे, सोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजा ही अनेक तास चालते, त्या पूजेच्या वेळेला देखील मर्यादा असली पाहिजे, मुख्यमंत्री हा वारकऱ्यांपेक्षा मोठा नाही, असं मत विश्व वारकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रामभाऊ महाराज झांबरे व्यक्त केल आहे. बुलढाण्यात आयोजित राज्यस्तरीय वारकरी परिषदेत ते बोलत होते. शिवाय या राज्यस्तरीय वारकरी परिषदेत बागेश्वर धामला आणि प्रदीप मिश्राला महाराष्ट्रात बंदी झाली पाहिजे, वारकऱ्यांना विमा मिळावा,पंढरपूरला आषाढी कार्तिकीला जाणाऱ्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवासापर्यंत सुरक्षा मिळावी, असे महत्वाचे ठराव या राज्य स्तरीय वारकरी परिषदेने एकमुखाने पारित करण्यात आले आहेत.