Nitesh Rane प्रकरणाचा उद्या 3 वाजता कोर्ट अंतिम निर्णय देणार

| Updated on: Jan 31, 2022 | 7:27 PM

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज (Bail application) फेटाळल्यानंतर त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आलं होतं. त्यानुसार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.

मुंबई : सिंधुदुर्गातील स्थानिक शिवसेना नेते संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack) प्रकरणात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होणार की दिलासा मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindudurga District Court) या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आज पूर्ण झाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद शांतपणे ऐकून घेतला. दरम्यान, कोर्टाची वेळ संपल्यानं या प्रकरणाचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता लागणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज (Bail application) फेटाळल्यानंतर त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आलं होतं. त्यानुसार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.