Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ चार दिवशी अवजड वाहनांना बंदी, पण का?
Mumbai Goa Highway | मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, काय आहे कारण?
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि वाहतूकदारांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गसह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणतेही प्रकारची अडचण किंवा त्रास होऊ नये यासाठी किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज असणार आहेत. १ आणि २ जून तसेच ५ आणि ६ जून रोजी अवजड वाहनांना बंदी असणार आहे. त्यापेक्षा जास्त वजन असणाऱ्या जड वाहनांना तसेच ट्रक, मल्टी एक्सेल ट्रेलर वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. हिंदवी स्वराज्यातील या ऐतिहासिक घटनेला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. गेली अनेक वर्ष शिवप्रेमी संघटना हा राज्याभिषेक सोहळा साजरा करतात. यावर्षी महाराष्ट्र शासनाने हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.