गोरगरीबांसाठी शिंदे सरकारकडून गुड न्यूज, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील वाचा ‘हे’ 9 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय
VIDEO | दिवाळी आणि गणपतीत गोर-गरीबांना अवघ्या 100 रुपयांत आनंदाचा शिधा अन् कॅसिनो कायदा रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झाले महत्त्वाचे निर्णय
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | राज्य सरकारने राज्यातील कॅसिनो कायदा रद्द करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आज घेतला आहे. यासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोरगरीबांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबांना अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल आदी साहित्य देण्यात येणार आहे. त्यावर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. यासह राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 5 हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.