आदित्य ठाकरेंच्या सभेत रडण्यामागचं कारण ‘त्या’ शेतकऱ्याने सांगितलं
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची अलीकडे औरंगाबाद मध्ये सभा झाली. या सभा ठिकाणी एक शेतकरी रडताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई: युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची अलीकडे औरंगाबाद मध्ये सभा झाली. या सभा ठिकाणी एक शेतकरी रडताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीव्ही 9 मराठीने त्या शेतकऱ्याशी संवाद साधला. “मी पहिल्यापासून शिवसेनेत आहे. लहानपणापासून शिवसेनेत काम केलं. मातोश्रीवर जाऊन आलोय. बाळासाहेबांची सभा ऐकली. शिवसेना अंगात भरली आहे”, असं तो शेतकरी म्हणाला. “50-50 कोटीचे खोके मिळाल्यामुळे आमदारांनी बंडखोरी केली ते पळून गेले. आदित्य ठाकरे सभेसाठी आले होते. त्यांची दया आली. फाटाफूट झाली म्हणून दु:ख झालं. शिवसेनेच्या नावावर बंडखोर आमदार मोठे झाले” असे शिवसैनिक असलेल्या शेतकऱ्याने सांगितलं.
Published on: Jul 25, 2022 05:57 PM
Latest Videos