Ganesh Chaturthi 2021 | लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन, प्राणप्रतिष्ठापना LIVE

Ganesh Chaturthi 2021 | लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन, प्राणप्रतिष्ठापना LIVE

| Updated on: Sep 10, 2021 | 2:24 PM

मुंबईसोबतच संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन अखेर घडलं आहे. आज गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या सर्व भक्तांच्या नजरा आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाकडे लागलेल्य होत्या. अखेर ते दर्शन झालं आहे. लालबागचा राजाचा फर्स्ट लूक अखेर समोर आला आहे.

मुंबईसोबतच संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन अखेर घडलं आहे. आज गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या सर्व भक्तांच्या नजरा आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाकडे लागलेल्य होत्या. अखेर ते दर्शन झालं आहे. लालबागचा राजाचा फर्स्ट लूक अखेर समोर आला आहे. लालबागच्या राजाची यंदाची मूर्ती कशी असेल याची सर्वच आतुरतेने वाट पाहात होते. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना नेमका राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेला दोन तास उशिर झाला. मात्र, अखेर राजाची पहिली झलक भक्तांना मिळाली.

यंदा लालबागच्या राजाचं विष्णू रुप अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. लालबागचा राजा शेष नागावर विराजमान असलेला यावेळी दिसतो आहे. त्याच्या एका हातात भगवान विष्णूचे सुदर्शनचक्र आहे. तर एका हातात शंख आहे. तसेच, भव्य अशा शेष नागावर लालबागचा राजा विराजमान झाला आहे. पिवळ्या पितांबरमधील राजाचं हे विष्णू रुप डोळ्याचं पारणं भेडणारं आहे.