भक्तीने भरलेला पहिला रिंगण सोहळा, पाहा याचि देही याची डोळा; रिंगण सोहळ्याचे ड्रोनद्वारे टिपलेली दृष्ये
विठ्ठल विठ्ठल च्या गजरात तो मार्गस्थ होत असतो. याच मार्गात होणारा रिंगन सोहळा हा वारकऱ्यांसाठी नवी ऊर्जा देणारा असतो. या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण आज पार पडले
इंदापूर : विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेला वारकारी हा पंढरीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत असतो. विठ्ठल विठ्ठल च्या गजरात तो मार्गस्थ होत असतो. याच मार्गात होणारा रिंगन सोहळा हा वारकऱ्यांसाठी नवी ऊर्जा देणारा असतो. या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण आज पार पडले. इंदापूर बेलवाडी येथे आज पहिला रिंगन सोहळा संपन्न झालंय. वारकऱ्यांना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते. पालखीला अगोदर पोलीस, नंतर झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या केल्या. देहभान हरपून विठुनामाचा जप करत, तुकाराम महाराजांचा जयघोष करत वारकऱ्यांनी पहिलं गोल रिंगण केलं.

सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य

दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ

पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच...

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
