VIDEO : अखेर इंदापूर आगारातून धावली पहिली एसटी!
इंदापुरातून पहिली बस धावलीय. इंदापूर-बारामती, इंदापूर-अकलूज अशा फेऱ्यांना सुरुवात झालीय. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संपा(ST Workers Strike)वर होते.
पुणे : इंदापूर बस स्थानका(Indapur Bus Stand)तून अखेर पहिली बस धावलीय. इथले एकूण ७७ एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेत. इंदापूर-बारामती, इंदापूर-अकलूज अशा फेऱ्यांना सुरुवात झालीय. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संपा(ST Workers Strike)वर होते. राज्य सरकारनं त्यांना कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं. पगारही वाढून दिला होता. त्यानंतर आज इथले डेपो मॅनेजर मेहबूब मनेरी यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन करत कामावर येण्यास सांगितलं होतं.