अखेर ठरलं! राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युलाही फिस्क; भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा
ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतर ती स्थगिती आता सुप्रीम कोर्टाने उठवल्याने भाजप, शिंदे गटासह नुकताच सत्तेत सामिल झालेल्या अजित पवार गटाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | गेल्या वर्ष भरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा रखडला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खो बसलेला या विषयाला 1 वर्षानंतर आता चालना मिळाली आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतर ती स्थगिती आता सुप्रीम कोर्टाने उठवल्याने भाजप, शिंदे गटासह नुकताच सत्तेत सामिल झालेल्या अजित पवार गटाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. तर त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अनेकांचे स्वप्न देखी सत्यात उतरणार आहे. दरम्यान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मार्ग मोकळा झाला असून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात यावरून फॉर्म्युला अखे ठरला. यावेळी सत्तेत मोठा वाटेकरी असणाऱ्या भाजपला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळणार आहेत. तर या नियुक्त्या पावसाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे.