शिवराज्याभिषेक सोहळा फक्त रायगडावरच नाही तर येथे होणार पहिल्यांदाच; महाराजांच्या सुवर्णमूर्तीला अभिषेक
याचदरम्यान मात्र कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात मात्र शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीला अभिषेक घातला जाणार आहे. नवीन राजवाड्यात यावर्षी पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय.
कोल्हापूर : रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. तेथे पायथ्यालाच आता शिवभक्तांना रोखण्यात आलं आहे. यावरून माजी खासदार छ्त्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्तांना आवाहन केलं आहे. याचदरम्यान मात्र कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात मात्र शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीला अभिषेक घातला जाणार आहे. नवीन राजवाड्यात यावर्षी पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. श्रीमंत शाहू छत्रपती मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हा शाही कार्यक्रम पार पडणार आहे. 349 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त नवीन राजवाड्यात विशेष कार्यक्रम करण्यात येणार आहे. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, याज्ञसेनी, छत्रपती मालोजीराजे छत्रपती, यांच्यासह छत्रपती कुटुंबातील सदस्य कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.