हा महाराष्ट्राचा अपमान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जितेंद्र आव्हाड असे का म्हणाले?
VIDEO | आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका, कुणावर साधला निशाणा?
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनकाळात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. आज मराठी भाषा दिन आहे. आज राज्यात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून सगळे एकत्र आले. यावेळी असे लक्षात आले की, संस्कृतपेक्षाही आधी मराठी भाषेचा जन्म झाला आहे. असे असताना मराठी भाषा दिल्लीच्या तख्तावरती डोकं घासतेय, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या. अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतो, पण दिल्लीकडून काही सकारात्मक भाव कळवलेलं नाही, अशातच विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल त्यांचं पहिलं भाषण हिंदीतून करतात, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 27, 2023 02:38 PM
Latest Videos