VIDEO : विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसचं आहे, राज्यपाल योग्य ती कार्यवाही करतील : Balasaheb Thorat
28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसचं आहे, राज्यपाल योग्य ती कार्यवाही करतील असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसचं आहे, राज्यपाल योग्य ती कार्यवाही करतील असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदा संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
Latest Videos