Rajya Sabha 2022: नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा झटका, तूर्तास मतदानाची परवानगी नाही
उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी तूर्तास नाकारलीय.
मुंबई : राज्यसभेच्या मतदानासाठी तूर्तास नवाब मलिक (Nawab Malik) यांना परवानगी मिळालेली नाही. आज राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election News) मतदान पार पडतंय. यामध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना राज्यसभेच्या मतदानाची परवानगी द्यावी, अशी याचीका करण्यात आली होती. मात्र, यावर मतदानासाठीचा अधिकार नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख यांना मिळणार का, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. याप्रकरणी गुरुवारी पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयानं मतदानासाठी कारागृहाबाहेर जाण्यास अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार देतं का?, याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपचंही लक्ष लागलं होतं. अखेर उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी तूर्तास नाकारलीय.