पुणेकरांसाठी नक्कीच चिंतेची बाब! मात्र इतिहासही पाहण्याची सुवर्ण संधी; धरणात पांडवकालीन मंदिर
पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातही असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे. येथे पाणी पातळी घटल्यानं, पाण्यातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आलंय. धरणात केवळ 6 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक.
पुणे : राज्यात वाढत्या उष्णेचा कहर अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. अनेक धरणाच्या पाण्यात कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे त्या धरणाच्या पोटात अनेक वर्ष दडलेल्या काळाच्या खुणा आता पहायला मिळत आहेत. तर त्या पाहण्यासाठी लोकांचे पाय तिकडे सरकत असल्याचेही पहायला मिळत आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातही असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे. येथे पाणी पातळी घटल्यानं, पाण्यातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आलंय. धरणात केवळ 6 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने, धरणातील पाणलोट क्षेत्रातील नदी पात्रात असलेले काबंरे गावातील पांडवकालीन कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर आलंय. मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वती मातेच मूर्ती आणि नंदी आहेत. पाण्याखाली गेलेलं हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी नागरिक आणि इतिहास संशोधक याठिकाणी भेट देतायत.