तरूणानं थेट सिनेमागृहाच्या बाहेर ‘द केरला स्टोरी’ची साकारली रांगोळी, बघा व्हिडीओ
VIDEO | नंदुबारमधील गौरव माळी या युवकाने सिनेमागृहाच्या बाहेर 'द केरला स्टोरी'च्या पोस्टरची रेखाटली रांगोळी
नंदुबार : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटात अदा शर्मा हिने मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटावरून राजकारण सुद्धा पाहायला मिळत आहे. अशातच अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध सुद्धा दर्शविण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटाला पंसती देखील पाहायला मिळाली आहे. नुकताच प्रकाशित झालेल्या द केरला स्टोरी या चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली जात आहे, तर काही सिनेमागृहांमध्ये मोफत शोच आयोजन करण्यात येत आहे. परंतु नंदुरबार शहरातील गौरव माळी या युवकाने सिनेमागृहाच्या बाहेर द केरला स्टोरी या सिनेमाच्या पोस्टर रांगोळीच्या माध्यमातून साकारलं आहे. तब्बल १२ तासाच्या परिश्रमानंतर ही रांगोळी तयार करण्यात आली, या रांगोळीला तयार करण्यासाठी अनेक रंगांचा वापर करण्यात आला, सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही रांगोळी तयार करण्यात आली आहे. या रांगोळीत सिनेमात दाखवण्यात आलेल्या स्टोरीची एक झलक आहे.