Swarnav Kidnap case Pimpri |अपहरण झालेल्या स्वर्णवचा 10 दिवसानंतर लागला शोध -tv9

Swarnav Kidnap case Pimpri |अपहरण झालेल्या स्वर्णवचा 10 दिवसानंतर लागला शोध -tv9

| Updated on: Jan 19, 2022 | 7:12 PM

पोलिसांना अपहरणकर्ता डूग्गूला घेऊन जात असतानाचा त्याचा पाठमोरा असलेले फुटेज मिळाले होते. त्यानंतर आताही पोलीसांच्या हाती डूग्गूला आणून सोडणाऱ्या व्यक्तीच सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. डूग्गूला घेऊन येत असताना सीसीटीव्हीमध्ये 2 वाजून 31 मिनिटे झाल्याचे चित्र दिसत आहे.

पुणे : बालेवाडी (Balewadi) परिसरातील अपहरण झालेला 4 वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पुणे शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बाणेर परिसरातून आठवडाभरापूर्वी (दि. 11 जानेवारी)ला डूग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या मुलाचे अपहरण (Kidnapping) झाले होते. अपहरण झालेला डूग्गू आज सापडला आहे. या अपहरण झाल्यानंतर सर्वत्र डूग्गूची चर्चा होती. डूग्गू पालकांना मिळावा म्हणून सोशल मीडियावरूनही अनेक जणांनी आवाहन केले होते. बालकाच्या अपहरणानंतर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना अपहरणकर्ता डूग्गूला घेऊन जात असतानाचा त्याचा पाठमोरा असलेले फुटेज मिळाले होते. त्यानंतर आताही पोलीसांच्या हाती डूग्गूला आणून सोडणाऱ्या व्यक्तीच सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. डूग्गूला घेऊन येत असताना सीसीटीव्हीमध्ये 2 वाजून 31 मिनिटे झाल्याचे चित्र दिसत आहे.

घटना पुनावळे परिसरातील असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतंय. या ठिकाणी अपहरणकर्त्यानं डूग्गूचा हात हातात गच्च पकडलाय. तो त्याला घेऊन कुठेतली चाललाय असं दिसतंय.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कचऱ्याच्या डब्यापलिकडे असणाऱ्या रस्त्यावरून डूग्गूला घेऊन चालत येताना अपहरणकर्ता दिसतो. सर्वसामान्यपणे चालत येत असताना रस्त्यात थांबलेल्या कारच्या पलिकडून तो डूग्गूच्या हाताला धरून चालताना दिसत आहे. या संपूर्ण व्हिडीओ त्यानं डूग्गूचा हात कुठेच सोडलेला नाही. कारसमोर आणि रस्त्याशेजारी असलेल्या भिंतीपलिकडे डूग्गू आणि अपहरणकर्ता चालत गेल्याचे दिसत असून काही क्षणानंतर ते दोघेही थांबले. त्यानंतर कारजवळ येऊन पुन्हा थांबलेत. तर पुन्हा त्या कारजवळ येऊन दोघंही घुटमळत असल्याचं दिसून आलंय. त्यानंतर काही क्षण थांबल्यानंतर कारच्या समोर चालत जाऊन डूग्गूला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या भिंतीपलिकडे सोडून अपहरणकर्ता वेगात पाठमोरा चालत गेल्याचं कैद झालंय. नेमकं मागे त्याला कुणी हाक मारली म्हणून तो मागे आला की आणखी काही झालं, हे मात्र व्हिडीओतून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. यावेळी त्याने चेहऱ्यावर कापड बांधल्याचंही दिसतंय. दुचाकीवरुन स्वर्णवचा जो फोटो समोर आला होता, अगदी हुबेहुब तसाच पोशाख अपहरकर्त्याचा असल्याचंही निदर्शनास आलंय.