पोरं खुश! पहिलीच्या पोरांची उंटावरून मिरवणूक, विद्यार्थ्यांचं हटके स्वागत
बुलढाण्यात पहिलीच्या मुलांचं स्वागत एकदम जंगी करण्यात आलंय. मुलांना उंटावर बसवून मिरवणूक काढण्यात आलीये.
बुलढाणा: पुन्हा कोरोना (Corona) रुग्णवाढीची चिंता सतावू लागल्यानं शाळा नेमक्या कधी सुरु होणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर शाळा सुरु झालेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा (School Starts) उत्साह शिगेला पोहचलाय. शाळा सुरु झाल्यावर मुलांचं स्वागत अनोख्या पद्धतीनं केलं जातं आणि यावेळी तर खास कारण आहे, कोरोना नंतर बऱ्याच दिवसांनी विद्यार्थी शाळेत येतायत मग तर स्वागत व्हायलाच हवं. बुलढाण्यात (Buldhana) पहिलीच्या मुलांचं स्वागत एकदम जंगी करण्यात आलंय. मुलांना उंटावर बसवून मिरवणूक काढण्यात आलीये. बुलढाण्याच्या खामगाव शिलोडी जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबविण्यात आलाय. या मुलांनी नुकताच पहिलीच्या वर्गात प्रवेश केलाय.
Published on: Jul 02, 2022 10:28 AM
Latest Videos