…तेव्हाचं ‘मविआ’चं सरकार पडलं असतं, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा वक्तव्यानं खळबळ
VIDEO | ... पण मी समझोता करण्यास नकार दिला अन् माझ्यावर कारवाई झाली, राष्ट्रवादीच्या नेत्यानं नेमके काय म्हटले?
नागपूर : तुरुंगात असताना माझ्याकडे दोन वर्षापूर्वी प्रस्ताव आले होते. तेव्हा मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती. पण दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केलं. पुढे ते असेही म्हणाले की, मी तुरुंगात जाण्याचा त्रास सहन केला. मी खोटे आरोप कुणावर करावेत हे मला सांगितलं गेलं. पण मी समझोता करण्यास नकार दिला. कुणावरही खोटे आरोप करणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे मला हे भोगावे लागलं, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. तर अनेक कारणांमुळे ईडीचा त्रास सुरू आहे. आमच्याविरोधात बोललं, भाषण केलं, भूमिका घेतली, तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. जयंत पाटील यांनीही त्यांच्यावर भाजपकडून दबाव होता असं स्पष्ट केलं, असंही त्यांनी म्हटलं आहे. टीव्ही9 मराठीशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रया व्यक्त केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
अनिल देशमुख यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांना कोणता दबाव आणि ऑफर होती याचे त्यांच्याकडे पुरावा आहे. त्यांच्याकडे व्हिडीओ क्लिप आहेत. त्यांना कोणी भेटून ऑफर दिली, कोण त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेऊ इच्छित होतं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. या संदर्भात अनिल देशमुख यांच्याशी माझं अनेकदा बोलणंही झालं आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार यांनाही देशमुख यांनी काही पुरावे दाखवले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.