‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार कुचकामी ठरलंय’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करावा, छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन
छत्रपती संभाजी नगर : मराठा समाजाला कुणबी या वर्गातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांच्या मागे लावण्यात आलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर असे लिहिले आहे की, जिवाची कुतरओड करणाऱ्या आणि जनावरांसोबत जनावरांसारखे शेतात राबणारे मराठे कुणबी नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर या बॅनरवर मराठा समाज कुणबी प्रमाणे करत असलेल्या सर्व कामांचा देखील उल्लेख केल्याचे पाहायला मिळत आहे. तर या आंदोलनाला आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. यावेळी अंबादास दानवे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकार कुचकामी ठरलं असून मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली.